सध्याच्या आधुनिक युगात पुस्तक वाचन मागे पडून ऑनलाईन पुस्तक, पीडीएफ, वेगवेगळी माध्यमांमुळे लोकं प्रत्यक्ष पुस्तकं वाचन व संग्रह करण्यास प्रवृत्त होत नाहीत. या सगळ्याचा विचार करून ही अनेक सामाजिक चळवळी उभारून " वाचनवेडा प्रतिष्ठाण" समाजात वाचन संस्कृती वाढावी व लोकांनी प्रत्यक्ष पुस्तकं वाचावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या वेगवेगळ्या उपक्रमाव्दारे मागील एक वर्षात "वाचनवेडा प्रतिष्ठाण" ने हजारो पेक्षा जास्त लोकांना या पुस्तक वाचन चळवळीत सामावून घेतलंय. हा या सामजिक चळवळीचा विजयच म्हणता येईल. आपण ही या वाचन चळवळीत सहभाग घेऊन एक सुदृढ आणि जागृत समाज निर्माण करण्यास हातभार लावावा ही विनंती. " वाचनवेडा प्रतिष्ठाण" तर्फे पुढील काही वाटचालीत घेण्यात येणारे उपक्रम खालील प्रमाणे.
अजून काही शंका असतील तर मला 866 941 9111 या नंबर वर फोन करा.
सस्नेह नमस्कार....!!!
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, पुस्तकवेडा च्या ऑफिशियल वेबसाईट वर लवकरच *ऐक ना* नावाचा उपक्रम सुरू होणार आहे...
या उपक्रमा अंतर्गत, नवनवीन साहित्यिकांच्या निवडक रचना,चारोळ्या,कविता, गझल, लेख, कथा, ललित वगैरे प्रकाशित करण्यात येणार आहेत.तरी आपले शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भेटलेल्या या सुवर्णसंधीचा समस्त नवोदितांनी लाभ घ्यावा...!
'ऐक ना' मध्ये आपल्या रचनांना प्रकाशित करण्यासाठी, फेसबुक वरील ' ऐक ना...' या पेज वर आपल्या कविता अपलोड कराव्यात .निवडक कवितांना वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येईल.
वाचनसंस्कृती आणि वाचक जिवंत रहावा,पर्यायाने यातून समाज घडावा,हा एकमेव उद्देश घेऊन सुरू झालेला प्रवास म्हणजे “पुस्तक संचय योजना” (पुस्तकभिशी). सध्याचा काळात वाढलेल्या पुस्तकांच्या किंमती आणि नुसत्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणारा समाज पुस्तकांपासून दुरवतो. या सगळ्यांचाच विचार करून, पुस्तक संचय योजना या उप्रमाअंतर्गत आठवडा पुस्तक संचय योजना व मासिक पुस्तक संचय योजना हे दोन उपक्रम राबवण्यात येतात.
आठवडा पुस्तक संचय योजना- यात प्रत्येक आठवड्याला 100 रुपये या प्रमाणे 12 आठवडे भरून(प्रत्येक सोमवार ते शुक्रवार पर्यंत) दर आठवड्याला या नियमाचे पालन करून आपले सदस्यत्व आबाधित ठेवायचे.दरम्यान दर रविवारी प्रत्येक गटातल्या सगळ्या एकूण सदस्यांचा नावांचा चिठ्या उडवून,त्यातल्या आठवड्याचा व एकूण सदस्यांचा गणती नुसार चिठ्या काढल्या जातात(उदा. 100 लोकं त्या गटात असतील तर १००/१२ यानुसार 8 चिठया उचलल्या जातात) ज्यांचा नंबर येतो त्यांना त्यांचा आवडीची 1200/- रुपयाची पुस्तके मिळतात(ही पुस्तके पाठवताना त्याचा कुरिअर चार्ज वेगळा असतो).
*हा लकी draw नाही भिशी आहे*
लकी ड्रा मध्ये एकदाच पैसे भरावे लागतात, परंतु भिशी म्हणजे EWI(इकवल वीक इन्स्टॉलमेंट). भिशी मध्ये
प्रत्येक आठवड्याला 100 रु. भरायचे आहेत.
*मासिक भिशी* - यात आठवडा भिशी प्रमाणे 500/- रुपये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखे पर्यंत 6 महिने भरायचे. प्रत्येक महिन्याचा 10 तारखेला आठवडा भिशी प्रमाणे गटातल्या सदस्यांचा संख्येनुसार चिठ्या उडवून नंबर काढले जातात व ज्यांना भिशी लागली असेल त्यांना 3000/- रुपयांची त्यांचा आवडीची पुस्तके पाठवली जातात(पोस्टल चार्ज जादा).
*या पुस्तक संचय योजनेचा फायदा काय?*
अजून काही शंका असतील तर मला 866 941 9111 या नंबर वर फोन करा.